दौंड-मनमाड मेगा ब्लॉकमुळे रेल्वेसेवा कोलमडणार २६ ते ३० मेदरम्यान प्रवाशांचे हाल; ६ गाड्या रद्द, १५ एक्स्प्रेसचे मार्ग बदलले, अनेक गाड्या उशिराने
दौंड-मनमाड मेगा ब्लॉकमुळे रेल्वेसेवा कोलमडणार
२६ ते ३० मेदरम्यान प्रवाशांचे हाल; ६ गाड्या रद्द, १५ एक्स्प्रेसचे मार्ग बदलले, अनेक गाड्या उशिराने
लेवाजगत न्यूज भुसावळ | मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर विसापूर-रांजणगाव-सारोळा स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या पायाभूत कामासाठी २६ ते ३० मेदरम्यान ‘ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या पाच दिवसांच्या मेगा ब्लॉकमुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार असून सहा गाड्या रद्द, १५ एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदल आणि चार गाड्या २ ते ८ तास विलंबाने धावणार आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हा ब्लॉक आल्याने गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.
या ६ गाड्या राहतील पूर्णपणे रद्द
- गाडी ११०२६ अमरावती-पुणे एक्सप्रेस : २७ व २९ मे रोजी अमरावतीहून रद्द
- गाडी ११०२५ पुणे-अमरावती एक्सप्रेस : २८ व ३० मे रोजी पुणेहून रद्द
- गाडी ०१९२२ झाशी-हडपसर विशेष : २७ मे रोजी झाशीहून रद्द
- गाडी ०९९२१ हडपसर-झाशी विशेष : २८ मे रोजी हडपसरहून रद्द
- गाडी ०१४५८ नागपूर-पुणे विशेष : २८ मे रोजी नागपूरहून रद्द
- गाडी ०९४५७ पुणे-नागपूर विशेष : २७ मे रोजी पुणेहून रद्द
या गाड्या सुटणार विलंबाने
- गाडी २०१५१ हडपसर-रेवा एक्सप्रेस : २८ मे रोजी २ तास उशिराने सुटेल
- गाडी १२२२१ पुणे-हावडा दुरांतो एक्सप्रेस : ३० मे रोजी ३ तास उशिराने सुटेल
- गाडी ०१४१५ पुणे-गोरखपूर विशेष : २८ व ३० मे रोजी तब्बल ८ तास उशिराने सुटेल
- गाडी ०१४४९ पुणे-दानापूर विशेष : ३० मे रोजी ३ तास उशिराने सुटेल
अमरावती-पुणेसह १५ एक्स्प्रेसचे मार्ग बदलले
दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील ब्लॉकमुळे अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या पर्यायी मार्गाने धावणार आहेत.
-
हावडा - पुणे एक्सप्रेस (१२१३०) : २६ व २८ मे रोजी हावडाहून सुटणारी गाडी मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळामार्गे पुण्यात येईल.
-
अमरावती - पुणे एक्सप्रेस (११०२६) : २७ व २८ मे रोजी अकोला, पूर्णा, परभणी, लातूर रोड, कुर्डुवाडी, दौंडमार्गे पुण्याकडे धावेल.
-
पुणे - अमरावती एक्सप्रेस (११०२५) : २८ व २९ मे रोजी पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर रोड, परभणी, पूर्णा, अकोला मार्गे जाईल.
-
हडपसर - बनारस एक्सप्रेस (२२५९०) : २८ व ३० मे रोजी पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाडमार्गे बनारसला जाईल.
-
यशवंतपूर - चंदीगड एक्सप्रेस (२२६८५) : २७ मे रोजी पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाडमार्गे धावेल.
-
जम्मूतावी - पुणे एक्सप्रेस (११०७८) : २६ व २८ मे रोजी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळामार्गे पुण्यात पोहोचेल.
-
पुणे - गोरखपूर एक्सप्रेस (१५०३०) : ३० मे रोजी लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाडमार्गे गोरखपूरकडे रवाना होईल.
-
निजामाबाद - पुणे एक्सप्रेस (११४१०) : २७, २८ व २९ मे रोजी परभणी, लातूर रोड, कुर्डुवाडी, दौंडमार्गे पुण्याकडे धावेल.
-
दौंड - निजामाबाद एक्सप्रेस (११४०९) : २८, २९ व ३० मे रोजी पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर रोड, परभणीमार्गे निजामाबादला जाईल.
-
केएसआर बंगळूर - नवी दिल्ली एक्सप्रेस (१२६२७) : २७ व २९ मे रोजी सोलापूर, कुर्डुवाडी, लातूर रोड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, मनमाडमार्गे धावेल.
-
हडपसर - हजुर साहेब नांदेड एक्सप्रेस (१७६२९) : २८ व २९ मे रोजी दौंड, कुर्डुवाडी, लातूर रोड, परभणीमार्गे नांदेडला जाईल.
-
पुणे - नागपूर एक्सप्रेस (२२१४१) : २८ मे रोजी पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाडमार्गे नागपूरकडे धावेल.
-
नांदेड - हडपसर एक्सप्रेस (१७६३०) : २८ व २९ मे रोजी परभणी, लातूर रोड, कुर्डुवाडी, दौंडमार्गे हडपसर येथे येईल.
-
हुबली - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२०६५७) : २९ मे रोजी सोलापूर, कुर्डुवाडी, लातूर रोड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, मनमाडमार्गे धावेल.
-
हजरत निजामुद्दीन - वास्को दि गामा एक्सप्रेस (१२७८०) : २९ मे रोजी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणेमार्गे धावेल.
दोन महिने आधीचे आरक्षण वाया
सध्या शाळा व महाविद्यालयांच्या सुट्ट्या असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी आहे. अनेक प्रवाशांनी २ ते ३ महिने आधीच ‘कन्फर्म’ तिकिटे आरक्षित केली होती. मात्र अचानक गाड्या रद्द झाल्याने आणि मार्ग बदलल्याने अनेकांचे प्रवास नियोजन कोलमडले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत