Contact Banner

कोथळी येथील युवकाचा भीषण मोटरसायकल अपघातात मृत्यू दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी; हॉटेल योगायोग समोरची घटना, गावावर शोककळा

 

kothali-youth-dies-in-horrific-motorcycle-accident-second-rider-seriously-injured

कोथळी येथील युवकाचा भीषण मोटरसायकल अपघातात मृत्यू

दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी; हॉटेल योगायोग समोरची घटना, गावावर शोककळा


kothali-youth-dies-in-horrific-motorcycle-accident-second-rider-seriously-injured


प्रतिनिधी मुक्ताईनगर-तालुक्यातील येथे शनिवारी (दि. २४ मे २०२६) रात्री झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे कोथळी गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर-भुसावळ रोडवरील हॉटेल योगायोग समोर रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. हॉटेलच्या मागील बाजूकडून दुचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्या नामदेव भिल (रा. कोथळी) यांनी कोथळीहून मुक्ताईनगरकडे जात असलेल्या पवन नामदेव चौधरी (वय ३२, रा. कोथळी) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की पवन चौधरी हे रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरे दुचाकीस्वार नामदेव भिल हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.