Contact Banner

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुसरण प्रत्येकाने करावे - कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत

 

everyone-should-follow-ideals-of-chhatrapati-shivaji-maharaj-capt-dr-rajendra-rajput

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुसरण प्रत्येकाने करावे - कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत

लेवाजगत न्यूज फैजपूर : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या यांच्या शौर्य, स्वराज्याची तळमळ आणि रयतेचे राज्य स्थापन करण्याच्या अद्वितीय कार्याचे प्रत्येकाने अनुसरण करावे, असे प्रतिपादन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले. ते यांच्या वतीने आयोजित धर्म संस्कार शिबिरात बोलत होते.

everyone-should-follow-ideals-of-chhatrapati-shivaji-maharaj-capt-dr-rajendra-rajput


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य आयोजक तथा गादीपती पूज्य राजधर बाबा पुजदेकर होते. व्यासपीठावर महेश वाघोदेकर, सौ. प्रज्ञा चौधरी यांच्यासह पालक व सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी” या ओळींमधून शिवचरित्राचे महत्त्व विशद केले. तसेच “शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे” या कवी भूषण यांच्या प्रसिद्ध काव्याचा संदर्भ देत त्यांनी यांच्या “इंद्रजिमी जंभ पर” या कवितेचे उदाहरणांसह प्रभावी विश्लेषण केले.

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी असलेल्या कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी कवितेचे चालबद्ध सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. अवघ्या ५० वर्षांच्या जीवनकाळात प्रचंड संघर्ष करत स्वराज्याची स्थापना व विस्तार करणाऱ्या यांच्या कर्तृत्वाचे काव्यरूप सादरीकरण बालमनांवर विशेष छाप सोडून गेले.

यावेळी शिबिरातील सहभागी मुला-मुलींनी शिवचरित्राचे अधिकाधिक वाचन करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला. पूज्य राजधर बाबा पुजदेकर यांनी धर्मसंस्कार शिबिराच्या माध्यमातून बालकांचा शारीरिक, भावनिक, मानसिक व बौद्धिक विकास साधण्यासाठी स्वसंरक्षण, लाठी-काठी प्रशिक्षण, कराटे, योग, ध्यानधारणा, मंत्रपठण तसेच विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.