मुलींच्या वस्तीगृहात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न
मुलींच्या वस्तीगृहात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील मुलींच्या वस्तीगृहात भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
या कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्यासह प्राचार्य डॉ. विशाखा गणवीर, डॉ. पियुष वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, वस्तीगृह अधीक्षक हर्षा कोल्हे, संकेत पाटील, शिवानंद बिरादार तसेच विविध मान्यवर, महंत, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना, पूजन आणि प्रार्थनेने करण्यात आली. भगवान बुद्धांनी दिलेला शांतता, करुणा आणि ज्ञानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. उपस्थित महंतांनी आपल्या मार्गदर्शनातून मानवता, सद्विचार आणि सामाजिक ऐक्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी ध्यान सत्र तसेच ‘शांतता संदेश’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम अधिक मंगलमय केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत