Contact Banner

सावदा येथील श्री. आ.गं. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 69.09 टक्के,विज्ञान शाखा 100%

 

savda-ag-highschool-nago-patil-junior-college-hsc-result-202

सावदा येथील श्री. आ.गं. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 69.09 टक्के,विज्ञान शाखा 100%

सावदा लेवाजगत न्यूज  प्रतिनिधी-
सावदा नगरपालिके संचलित श्री. आ.ग. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा यांचा फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयाने समाधानकारक यश संपादन केले आहे.

विज्ञान शाखेत कु. कुंकल अनिल नेमाडे यांनी 545 गुण मिळवत 90.83 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर चि. चेतन संजय महाजन यांनी 525 गुणांसह 87.50 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.

कला शाखेत चि. सागर उमाकांत माळवे यांनी 440 गुणांसह 73.33 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच कु. हर्षाली भगवान तायडे यांनी 350 गुणांसह 58.33 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.

महाविद्यालयाचा एकूण निकाल 69.09 टक्के लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत 128 पैकी सर्व 128 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर कला शाखेत 105 पैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष फिरोजखान हबीबिल्लाखान पठाण, शिक्षण सभापती सचिन बहेटे, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी भूषण वर्मा, मुख्याध्यापक प्रकाश गणू शाळेखार, पर्यवेक्षक संजय मोतीराम महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.