ग्वालियर आयडीई बुटकॅम्पमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; प्रथम क्रमांक पटकावला
ग्वालियर आयडीई बुटकॅम्पमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; प्रथम क्रमांक पटकावला
लेवाजगत न्यूज | जळगाव
गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी एआयसीटीई (AICTE) आणि एमआयसी (MIC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयडीई बुटकॅम्प एडिशन ३ फेस २ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.
हा बुटकॅम्प माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, ग्वालियर (मध्यप्रदेश) येथे पार पडला. देशभरातील निवडक विद्यार्थ्यांना नवोपक्रम, डिझाईन आणि उद्योजकता क्षेत्रात कौशल्य विकसित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये द्वितीय वर्ष संगणक विभागाचे राज सुनिल सूर्यवंशी, विवेक चंद्रकांत ठाकूर, निशात किरण पाटील आणि कृष्णा ठोंबरे यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना प्रा. कल्पेश वाणी, प्रा. किरण बाविस्कर आणि प्रा. राजनंदिनी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण स्टार्टअप आयडियावर काम करत प्रभावी सादरीकरण केले.
बुटकॅम्पदरम्यान विद्यार्थ्यांना आयडिया व्हॅलिडेशन, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, प्रॉडक्ट डिझाईन, फायनान्शियल लिटरसी आणि पिचिंग स्किल्स याबाबत तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन मिळाले. तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली.
या स्पर्धेत देशभरातून एकूण ४४ संघ सहभागी झाले होते. त्यातून गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने टॉप ५ मध्ये स्थान मिळवत उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. ही कामगिरी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
या यशामुळे विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर उद्योजकतेच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील (आयआयसी अध्यक्ष), डॉ. हेमंत इंगळे (आयआयसी उपाध्यक्ष), डॉ. अतुल बराठे (आयआयसी समन्वयक), शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी तसेच विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत