Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा

 

godavari-engineering-college-world-telecommunication-day-celebrated

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १७ मे २०२६ रोजी जागतिक दूरसंचार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतर्गत टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा यंदाचा विषय “डिजिटल लाइफ लाईन : स्ट्रेंगथनिंग रेसिलियन्स इन ए कनेक्टेड वर्ल्ड” असा होता. संपूर्ण कार्यक्रमात या विषयाची प्रभावी मांडणी करण्यात आली.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, विभाग प्रमुख डॉ. हेमंत इंगळे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी दूरसंचार क्षेत्राचा इतिहास, ५जी तंत्रज्ञान, उपग्रह संप्रेषण, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि डिजिटल भविष्य यांसारख्या विविध विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या मांडणीतून दूरसंचार क्षेत्रातील नव्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची सखोल समज दिसून आली.

मार्गेश वाघ, ऋतुजा ठेंग, यश धनगर, पावबा पाटील, प्राजक्ता पाटील, तुळजा महाजन आणि प्रणव थोरात यांनी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या भविष्यावर विचारमंथन केले.

विभाग प्रमुख डॉ. हेमंत इंगळे यांनी आपल्या भाषणात दूरसंचार हे आधुनिक डिजिटल युगाचे बळकट आधारस्तंभ असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग क्षेत्रातील दूरसंचारचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून या क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी संशोधन व नवोपक्रमाच्या माध्यमातून संस्थेसाठी उपग्रह निर्मितीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच 5G, वायरलेस कम्युनिकेशन, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि आधुनिक दूरसंचार क्षेत्रातील विविध संधींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. “तंत्रज्ञानाच्या बळावर विद्यार्थी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतात,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमातून दूरसंचार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित होण्यासोबतच भविष्यातील टेलिकॉम क्षेत्रातील नेतृत्व घडवण्यासाठी एक दिशादर्शक मंच उपलब्ध झाला. डिजिटल समावेश, तंत्रज्ञान सक्षमीकरण आणि कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमाचे नियोजन प्रा. आर. व्ही. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कीर्ती बोरोले या विद्यार्थिनीने केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.