काँग्रेस आदिवासी सेलच्या रावेर व यावल तालुका अध्यक्षपदी तडवी यांची नियुक्ती
काँग्रेस आदिवासी सेलच्या रावेर व यावल तालुका अध्यक्षपदी तडवी यांची नियुक्ती
लेवाजगत न्यूज सावदा-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदिवासी सेल विभागाकडून राज्यभर ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यामध्ये रावेर व यावल तालुक्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
यावल तालुका काँग्रेस आदिवासी सेल अध्यक्षपदी सांगवी बु. येथील मा. श्री. पिरन मेहबूब तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रावेर तालुका काँग्रेस आदिवासी सेल अध्यक्षपदी पाल येथील मा. श्री. कामिल नामदार तडवी यांची निवड करण्यात आली आहे.
दोन्ही नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. काँग्रेस आदिवासी सेल हे आदिवासी समाजाच्या हक्क, विकास आणि सामाजिक न्यायासाठी कार्य करणारे महत्त्वपूर्ण संघटन मानले जाते. आदिवासी बांधवांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य तसेच मूलभूत प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी हा विभाग सातत्याने कार्यरत असतो.
आगामी काळात आदिवासी सेलच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे विचार, धोरणे आणि निर्णय तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हे दोन्ही पदाधिकारी सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत