Contact Banner

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न

 




godavari-imr-five-day-national-faculty-development-program-concludes-successfully



गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न

लेवाजगत न्यूज जळगाव : महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम (एफडीपी) उत्साहात संपन्न झाला. “प्रगत संशोधन पद्धती, नैतिकता आणि प्रकाशन व निधीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर आधारित ही कार्यशाळा ११ ते १५ मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

या कार्यशाळेत देशभरातील तब्बल १३४२ शिक्षक व संशोधकांनी सहभाग नोंदविला. उच्च शिक्षण क्षेत्रातील संशोधन कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान, नैतिकता, शैक्षणिक लेखन तसेच संशोधन निधीसाठी प्रस्ताव लेखन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

यांनी “डिजिटल युगातील संशोधन नैतिकता आणि सचोटी” या विषयावर मार्गदर्शन करताना संशोधनातील नैतिक मूल्यांचे पालन, डेटा गोपनीयता आणि साहित्य चौर्य टाळण्याचे महत्त्व स्पष्ट केले. यांनी डिजिटल संशोधन साधने व ऑनलाइन सर्वेक्षण पद्धतींबाबत माहिती दिली.

यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांच्या सहाय्याने साहित्य समीक्षा अधिक परिणामकारक कशी करता येते, याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच यांनी शैक्षणिक लेखन व उच्च-प्रभावशाली आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. यांनी संशोधन निधीसाठी प्रभावी प्रस्ताव लेखनाचे महत्त्व स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे आयोजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी , तसेच आयोजन समितीतील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमातील सर्व सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, या कार्यशाळेमुळे शिक्षक व संशोधकांना आधुनिक संशोधन पद्धतींबाबत नवे ज्ञान मिळाल्याची भावना सहभागींकडून व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.