Contact Banner

मनसे उरण महिलां तालुका प्रमुख पदी सौ.कविता म्हात्रे यांची निवड

 

kavita-mhatre-appointed-mns-uran-women-taluka-chief

kavita-mhatre-appointed-mns-uran-women-taluka-chief


मनसे उरण महिलां तालुका प्रमुख पदी  सौ.कविता म्हात्रे यांची निवड  


उरण प्रतिनिधी -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उरण महिला तालुका प्रमुख पदी सौ.कविता राकेश म्हात्रे यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली आहे , आशाचे नवनिर्माण सेनेचे अधिकृत पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी सौ. कविता म्हात्रे यांना मुंबई शिवतीर्थ येथे देण्यात आले आहे,

 उरण तालुक्यात महिला सक्षमीकरणाचे काम तसेच लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणे,महिलांचे कोणतेही प्रश्न असल्यास त्यांना मदत करणे, बेरोजगारी, स्थानिकांना रोजगार, बेकायदेशीर धंदे वाढती गुन्हेगारी, रस्ते, पाणी प्रकल्पग्रस्त यावर मनसेने सातत्याने आवाज उठवला आहे, म्हणून राज साहेब ठाकरे यांनी कविता म्हात्रे यांच्या कामाची पोचपावती म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वासाची मोहर उमटवली आहे, या फेरनिवडी नंतर कविता म्हात्रे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की राज साहेबांनी आणि जिल्हा अध्यक्ष संदेश भाई  यांनी माझ्यावर परत एकदा दाखवलेल्या विश्वासास मी पात्र ठरेन, आणि अजून जोमाने काम करेन....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.