Contact Banner

एसी बंद, उकाडा अन् चित्रपटगृहातच मृत्यू; जळगावातील मेट्रो थिएटरमध्ये हृदयद्रावक घटना

 

ac-off-heatwave-death-inside-metro-theatre-jalgaon

ac-off-heatwave-death-inside-metro-theatre-jalgaon


एसी बंद, उकाडा अन् चित्रपटगृहातच मृत्यू; जळगावातील मेट्रो थिएटरमध्ये हृदयद्रावक घटना

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी  जळगाव-

जळगाव शहरातील मेट्रो सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या एका प्रौढाचा उकाडा आणि अस्वस्थतेमुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. एसी व्यवस्थित सुरू नसल्याने चित्रपटगृहात प्रचंड घुसमट होत असल्याची तक्रार प्रेक्षकांकडून करण्यात येत होती. याच दरम्यान एका प्रेक्षकाला अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ललित सुखलाल सोनवणे (वय ५०, रा. न्यू लक्ष्मी नगर, कोल्हे हिल्स रोड, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते आरटीओ कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या लतिका सोनवणे यांचे मोठे सुपुत्र होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ललित सोनवणे हे गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मेट्रो सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, थिएटरमध्ये एसी व्यवस्थित कार्यरत नसल्याने प्रचंड उकाडा आणि घुसमट जाणवत होती. मध्यंतराच्या सुमारास म्हणजेच रात्री साडेदहा वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते वॉशरूममध्ये गेले. मात्र तेथेच अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले.

घटनेनंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उकाड्यामुळे प्रेक्षक त्रस्त

दरम्यान, संबंधित धार्मिक चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सुमारे शंभर ते सव्वाशे प्रेक्षक थिएटरमध्ये उपस्थित होते. याचवेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने एसीची कार्यक्षमता कमी झाली होती. अनेक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये “सफोकेशन” होत असल्याची तक्रार व्यवस्थापनाकडे केली होती.

याबाबत सिनेमागृह व्यवस्थापनाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, एसी सुरू होता; मात्र बाहेरील वाढलेल्या तापमानामुळे तो पूर्ण क्षमतेने थंडावा देऊ शकत नव्हता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.