Contact Banner

अजगराला सर्पमित्राकडून जीवदान ,उकाड्यामुळे वन्यजीवांचा मानवी वस्तीत शिरकाव

 

python-rescued-by-snake-rescuer-wild-animals-enter-human-settlements-due-to-heat


अजगराला सर्पमित्राकडून जीवदान ,उकाड्यामुळे वन्यजीवांचा मानवी वस्तीत शिरकाव


चिरनेर प्रतिनिधी | दत्तात्रेय म्हात्रे-


चिरनेर येथील मुळपाडा परिसरात मंगळवारी (दि. 26) दुपारच्या सुमारास एक भला मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. उकाड्यामुळे गारव्याच्या शोधात आलेला साधारण ९ ते १० फूट लांबीचा अजगर अरुण काशिनाथ मुंबईकर यांच्या घराजवळ ठेवलेल्या पत्र्याच्या अडगळीत दिसून आला.


त्यावेळी घरात एकट्याच असलेल्या कमल मुंबईकर या घाबरून गेल्या. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत मुलगा प्रतीक मुंबईकर याला मोबाईलवरून माहिती दिली. प्रतीक यांनी तत्काळ स्थानिक सर्पमित्र जयवंत ठाकूर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.


माहिती मिळताच सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत शिताफीने अजगराला पकडून सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. उकाड्यामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे.


सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा इजा होण्यापूर्वीच अजगराला पकडण्यात यश आले. त्यानंतर उरण तालुका वनविभागाच्या निर्देशानुसार त्या अजगराला सुरक्षित वनक्षेत्रात सोडून देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.