Contact Banner

रीलस्टार रोहिणी पाराध्ये यांची आत्महत्या; पतीची भावूक पोस्ट व्हायरल

 

reelstar-rohini-paradhye-suicide-husbands-emotional-post-goes-viral

रीलस्टार रोहिणी पाराध्ये यांची आत्महत्या; पतीची भावूक पोस्ट व्हायरल

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील घटना; सोशल मीडियावर हळहळ व्यक्त

सोलापूर | प्रतिनिधी-

सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) यांनी बुधवारी दुपारी मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे स्वतःच्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरासह सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांच्या रील्सला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत त्यांनी सुरू केलेले “हॉटेल ग्रामपंचायत” हे अल्पावधीत लोकप्रिय झाले होते. हॉटेलच्या प्रचारासाठी बनवलेल्या रील्समुळे दोघांनीही नेटिझन्सच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती.

मात्र, बुधवारी दुपारी रोहिणी यांनी हॉटेलमध्ये टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, रोहिणी यांच्या निधनानंतर पती निलेश पाराध्ये यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.