साने गुरुजी विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; विज्ञान शाखेची चमकदार कामगिरी
साने गुरुजी विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; विज्ञान शाखेची चमकदार कामगिरी
लेवाजगत न्युज यावल प्रतिनिधी-
नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा एकूण निकाल ३५.२ टक्के लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेने उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल ९७.५३ टक्के निकालाची नोंद केली आहे.
शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे —
🔹 विज्ञान शाखा : ९७.५३ टक्के
(८१ पैकी ७९ विद्यार्थी उत्तीर्ण)
🔹 कला शाखा : १२.२ टक्के
(१८३ पैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण)
🔹 वाणिज्य शाखा : २२.८५ टक्के
(७० पैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण)
विद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
कला शाखा
- मोरे अंकिता विनोद — ३५४ गुण (५९.००%)
- साळुंके संध्या मुकुंदा — ३५३ गुण (५८.८३%)
- तडवी सायना असलम — ३३९ गुण (५६.५०%)
वाणिज्य शाखा
- तेली रूपाली नरेंद्र — ३७३ गुण (६२.१७%)
- पाटील प्रांजल दिगंबर — ३४० गुण (५६.६७%)
- पाटील नेवाली संजय — ३०५ गुण (५०.८३%)
विज्ञान शाखा
- पाटील खुशबु रविंद्र — ४५१ गुण (७५.१७%)
- वाघ वैष्णवी समाधान — ४३५ गुण (७२.५०%)
- नेहेते ऋषिकेश श्रीकृष्ण — ४३२ गुण (७२.००%)
कुशवाह नविनकुमार सुंदरसिंग — ४३२ गुण (७२.००%)
विद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत विद्यालयाच्या निकालात विशेष भर घातली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक व संस्थेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत