सावदा येथील पुरातन श्री शनेश्वर मंदिरात शनेश्वर जयंती व शनी अमावस्येनिमित्त अभिषेक पूजन
सावदा येथील पुरातन श्री शनेश्वर मंदिरात शनेश्वर जयंती व शनी अमावस्येनिमित्त अभिषेक पूजन
लेवाजगत न्यूज सावदा : येथील मस्कावद रोडलगत असलेल्या पुरातन श्री शनेश्वर मंदिरात शनेश्वर जयंती व शनी अमावस्या निमित्त शनिवारी पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटे पाच वाजता विधीवत अभिषेक पूजन करण्यात आले.
यावेळी प्रमोद चौधरी, भूषण महेश्वरी व दीपक किल्ले यांच्या हस्ते अभिषेक पूजन संपन्न झाले. मंदिर परिसरात ग्रामदैवत मरीमाता तसेच श्री शनेश्वर महाराज यांच्या मूर्ती असून, दर्शनासाठी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
शनी अमावस्या व शनेश्वर जयंतीच्या निमित्ताने भाविकांनी पूजा-अर्चा करत मनोभावे दर्शन घेतले. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत