Contact Banner

सावद्याच्या हेरंब पाटीलची राष्ट्रीय पातळीवर झेप; IIT Bombay मध्ये मिळविला प्रवेश

 

savda-heramb-patil-achieves-national-success-gets-admission-iit-bombay

सावद्याच्या हेरंब पाटीलची राष्ट्रीय पातळीवर झेप; IIT Bombay मध्ये मिळविला प्रवेश


savda-heramb-patil-achieves-national-success-gets-admission-iit-bombay


लेवाजगत न्यूज प्रतिनिधी  सावदा-सावदा येथील इंदू पॅथॉलॉजीचे संचालक राजेंद्र पाटील यांचे पुतणे व  डॉ. जितेंद्र पाटील यांचे चिरंजीव हेरंब पाटील याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत येथे कॉम्प्युटर सायन्स शाखेतील मास्टर्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला आहे.

देशातील अत्यंत प्रतिष्ठेची संस्था मानल्या जाणाऱ्या IIT Bombay मध्ये प्रवेश मिळविणे हे मोठे यश मानले जाते. हेरंबने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्याच्या या कामगिरीमुळे मस्कावद व सावदा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हेरंबच्या यशाबद्दल शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे व पाटील कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नवी मुंबई ऐरोली येथे त्यांचे आप्तेष्ट हितेंद्र पाटील व चारुलता पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत हेरंबचे अभिनंदन केले. तसेच सावदा येथील डॉ. व्ही जे वारके यांनीही त्याचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी च्या डोळ्यामध्ये आनंदा अश्रू आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.