सावद्यात अधिक मास निमित्त रविवारपासून स्वामीनारायण मंदिर येथे ‘जनमंगलनामावली’ कथा
सावद्यात अधिक मास निमित्त रविवारपासून स्वामीनारायण मंदिर येथे ‘जनमंगलनामावली’ कथा
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावदा-येथील श्री स्वामिनारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित केली जाणारी कथेची परंपरा यावर्षीही उत्साहात साजरी होणार आहे. गेल्या ११५ वर्षांपासून अविरत सुरू असलेली ही परंपरा जोपासत, १७ मे ते ३१ मे या कालावधीत विशेष कथांचे आयोजन करण्यात आले आहे.
सावदा मंदिरात दरवर्षी अधिक मासात कथेचे आयोजन केले जाते. यावर्षी कथेसाठी ‘जनमंगलनामावली’ हा विषय निवडण्यात आला आहे. शतानंद स्वामी यांनी रचलेल्या या स्तोत्रामध्ये स्वामिनारायण भगवानांच्या १०८ नावांची रचनेबद्ध मांडणी करण्यात आली असून, त्यातील अर्थ व सविस्तर विवेचन भाविकांसमोर मांडले जाणार आहे.
२७ मे ते ३१ मे दरम्यान दररोज रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत सद्गुरु शास्त्री स्वामी भक्तिप्रियदास हे श्री स्वामिनारायण मंदिर येथे मार्गदर्शन करणार आहेत. या संपूर्ण कथेसाठी कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदास, शास्त्री स्वामी धर्म किशोरदास, पुजारी स्वामी सत्यप्रकाशदास तसेच भंडारी स्वामी माधवप्रियदास यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
सावदा शहर व परिसरातील सर्व पुरुष व महिला भाविकांनी अधिक मासातील या कथांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत