Contact Banner

सावदा येथे सुमन श्रीकांत चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन

 


सावदा येथे सुमन श्रीकांत चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन

लेवाजगत न्यूज सावदा : येथील गांधी चौक परिसरातील रहिवासी सुमन श्रीकांत चौधरी यांचे शनिवार दि. १६ मे रोजी पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या माजी नगराध्यक्ष  राजेंद्र श्रीकांत चौधरी यांच्या मातोश्री तसेच सावदा नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी महेश श्रीकांत चौधरी यांच्या आई होत तर माजी नगराध्यक्षा हेमांगी राजेंद्र चौधरी यांच्या सासू होत.

त्यांच्या निधनाने सावदा शहरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना,एक मुलगी,जवाई, नातू, नाती असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि. १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता गांधी चौक, सावदा येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

लेवाजगत न्यूज परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.