उद्या दहावीचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार
उद्या दहावीचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार
लेवाजगत न्यूज सावदा- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. निकालापूर्वी सकाळी 11 वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येणार आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालक निकालाची आतुरतेने वाट पाहत असून, उद्या त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल :
- sscresult.mahahsscboard.in
- Target Publications Results
- DigiLocker Results
- MahaHSSCBoard Official Website
- Navneet Results
दरम्यान, राज्य मंडळाने गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. पूर्वी जून महिन्यापर्यंत लांबणीवर पडणारे निकाल आता मे महिन्यातच जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेला वेग मिळत आहे. 2 मे रोजी बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीचा निकालही उद्या जाहीर होत असून, यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेचाही मार्ग मोकळा होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत