रेल्वेचा 13 तासांचा मेगा ब्लॉक; कसारा लोकल बंद, पंचवटी व धुळे इंटरसिटीसह अनेक गाड्यांवर परिणाम
रेल्वेचा 13 तासांचा मेगा ब्लॉक; कसारा लोकल बंद, पंचवटी व धुळे इंटरसिटीसह अनेक गाड्यांवर परिणाम
लेवाजगत न्यूज | मुंबई-
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आटगाव रेल्वे स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शनिवार, 6 जून रोजी दुपारी 2 वाजल्यापासून रविवार, 7 जून रोजी पहाटे 3 वाजेपर्यंत 13 तासांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कसारा मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवांसह लांब पल्ल्याच्या अनेक एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत.
कसारा लोकल सेवा पूर्णपणे बंद
ब्लॉक कालावधीत आसनगाव ते कसारा दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी 11.42 ते रात्री 8.44 दरम्यान सुटणाऱ्या सर्व कसारा लोकल गाड्या आसनगावपर्यंतच धावतील. काही सेवा खडवली, टिटवाळा आणि कल्याण येथेच समाप्त केल्या जातील.
कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्याही आसनगाव येथूनच सुरू होणार आहेत. ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी शेवटची लोकल सकाळी 10.16 वाजता सुटेल, तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे शेवटची लोकल दुपारी 12.19 वाजता धावेल. ब्लॉक संपल्यानंतर रविवारी पहाटे 4.19 वाजता सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी आणि पहाटे 3.51 वाजता कसाऱ्याहून सीएसएमटीकडे पहिली लोकल सुरू होईल.
चार महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द
ब्लॉकमुळे खालील गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत :
- गाडी क्र. 11011 मुंबई–धुळे इंटरसिटी एक्स्प्रेस (6 जून)
- गाडी क्र. 11012 धुळे–मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (6 जून)
- गाडी क्र. 12109 मुंबई–मनमाड पंचवटी एक्स्प्रेस (6 जून)
- गाडी क्र. 12110 मनमाड–मुंबई पंचवटी एक्स्प्रेस (6 जून)
अनेक गाड्यांचे मार्ग बदलले
कसारा-इगतपुरी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत असल्याने काही गाड्या कल्याण–कर्जत–लोणावळा–पुणे–अहिल्यानगर–कोपरगाव–मनमाड या पर्यायी मार्गाने धावणार आहेत.
यामध्ये:
- 11001 मुंबई–बल्हारशाह नंदीग्राम एक्स्प्रेस
- 12131 दादर–साईनगर शिर्डी एक्स्प्रेस
- 17057 मुंबई–लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेस
- 11071 एलटीटी–बलिया कामायणी एक्स्प्रेस
- 01027 दादर–गोरखपूर समर स्पेशल
- 15066 पनवेल–गोरखपूर एक्स्प्रेस
यांचा समावेश आहे.
काही गाड्या अर्ध्यावरच थांबणार
- 12072 हिंगोली–मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस नाशिक रोडपर्यंतच धावेल.
- 17611 नांदेड–मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस मनमाडपर्यंतच धावेल.
- 12071 मुंबई–हिंगोली जनशताब्दी नाशिक रोडहूनच परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल.
- 17612 मुंबई–नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस मनमाडहूनच सुटेल.
अनेक एक्स्प्रेस गाड्या उशिराने सुटणार
हावडा मेल, कोलकाता मेल, शालिमार एक्स्प्रेस, बनारस एक्स्प्रेस, पाटलीपुत्र एक्स्प्रेस, गोरखपूर हॉलिडे स्पेशल, अमृतसर एक्स्प्रेस, हटिया एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस आणि कुशीनगर एक्स्प्रेस यांसह अनेक गाड्या 2 ते 5.30 तास उशिराने सुटणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच स्टेशनवर यावे, असे आवाहन केले आहे. विशेषतः कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड आणि धुळे मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
👉रद्द गाड्या:--
1) गाडी क्र 11011 मुंबई -- धुळे *इंटरसिटी* एक्सप्रेस दि 06.06.2026 रोजी मुंबई हुन रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी क्र 11012 धुळे -- मुंबई *इंटरसिटी* एक्सप्रेस दि 06.06.2026 रोजी धुळे हुन रद्द करण्यात आली आहे.
3) गाडी क्र 12109 मुंबई -- मनमाड *पंचवटी* एक्सप्रेस दि 06.06.2026 रोजी मुंबई हुन रद्द करण्यात आली आहे.
4) गाडी क्र 12110 मनमाड -- मुंबई *पंचवटी* एक्सप्रेस दि 06.06.2026 रोजी मनमाड हुन रद्द करण्यात आली आहे.
👉गाड्यांच्या मार्गात बदल :--
दि 06.06.2026 रोजी _कल्याण,, कसारा,, इगतपुरी,, नाशिक रोड,, मनमाड_ ऐवजी *कल्याण,,कर्जत,, लोणावळा,, पुणे,, अहिल्यानगर,, कोपरगाव,, मनमाड* मार्गे धावणाऱ्या गाड्या :--👇
👉 गाडी क्र 11001 मुंबई -- बल्हारशाह *नंदीग्राम* एक्सप्रेस
👉 गाडी क्र 12131 दादर -- साईनगर शिर्डी एक्सप्रेस
👉 गाडी क्र 17057 मुंबई -- लिंगमपल्ली *देवगिरी* एक्सप्रेस
👉 गाडी क्र 11071 लो.टि.टर्मिनस -- बलिया *कामायणी* एक्सप्रेस
👉 गाडी क्र 01027 दादर -- गोरखपूर *समर स्पेशल* एक्सप्रेस
👉 गाडी क्र 15066 पनवेल -- गोरखपूर *पनवेल* एक्सप्रेस
👉शॉर्ट टर्मिनट / शॉर्ट ओरिजिनेट
👉 गाडी क्र 12072 हिंगोली -- मुंबई *जनशताब्दी* एक्सप्रेस दि 06.06.2026 रोजीं *मुंबई* पर्यंत जाणार नाही,, हीं गाडी *नाशिक रोड पर्यंतच धावेल.*
👉 गाडी क्र 17611 नांदेड -- मुंबई *राज्यराणी* एक्सप्रेस दि 05.06.2026 रोजीं *मुंबई* पर्यंत जाणार नाही,, हीं गाडी *मनमाड पर्यंतच धावेल.*
👉 गाडी क्र 12071 मुंबई -- हिंगोली *जनशताब्दी* एक्सप्रेस दि 06.06.2026 रोजीं *मुंबई* ऐवजी ,, हीं गाडी *नाशिक रोड हुनच परतीला सुटेल.*
👉 गाडी क्र 17612 मुंबई -- नांदेड *राज्यराणी* एक्सप्रेस दि 06.06.2026 रोजीं *मुंबई* ऐवजी,, हीं गाडी *मनमाड हूनच परतीला सुटेल.*
👉Train Rescheduled
1) दि. 06.06.2026
👉गाडी क्र 12809 डाऊन मुंबई -- हावडा *मुंबई* मेल
*मुंबई* हुन 04:10 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 01:20 AM.
2) दि. 06.06.2026
👉गाडी क्र 12322 डाऊन मुंबई -- हावडा *कोलकाता* मेल
*मुंबई* हुन 03:15 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 01:30 AM.
3) दि. 06.06.2026
👉गाडी क्र 18029 डाऊन लो.टि.टर्मिनस -- शालिमार एक्सप्रेस
*लो.टि.टर्मिनस* हुन 03:20 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 01:20 AM.
4) दि. 06.06.2026
👉गाडी क्र 12167 डाऊन लो.टि.टर्मिनस -- बनारस एक्सप्रेस
*लो.टि.टर्मिनस* हुन 03 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 01:45 AM.
5) दि. 06.06.2026
👉गाडी क्र 12141 डाऊन लो.टि.टर्मिनस -- पाटलीपुत्र एक्सप्रेस
*लो.टि.टर्मिनस* हुन 02:25 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 02:00 AM.
6) दि. 06.06.2026
👉गाडी क्र 01079 डाऊन मुंबई -- गोरखपूर *हॉलिडेज स्पेशल* एक्सप्रेस
*मुंबई* हुन 05:30 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 04:00 AM.
7) दि. 06.06.2026
👉गाडी क्र 11057 डाऊन मुंबई -- अमृतसर *पठाणकोट* एक्सप्रेस
*मुंबई* हुन 02:30 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 02:00 AM.
8) दि. 07.06.2026
👉गाडी क्र 12811 डाऊन लो.टि.टर्मिनस -- हटिया एक्सप्रेस
*लो.टि.टर्मिनस* हुन 02:00 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 02:15 AM.
9) दि. 07.06.2026
👉गाडी क्र 22177 डाऊन मुंबई -- बनारस *महानगरी* एक्सप्रेस
*मुंबई* हुन 02:00 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 02:15 AM.
10) दि. 07.06.2026
👉गाडी क्र 22538 डाऊन लो.टि.टर्मिनस -- गोरखपूर *कुशीनगर* एक्सप्रेस
*लो.टि.टर्मिनस* हुन 01:55 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 02:30 AM.
11) दि. 07.06.2026
👉गाडी क्र 02141 डाऊन मुंबई -- नागपूर *हॉलिडेज स्पेशल* एक्सप्रेस
*मुंबई* हुन 02:10 तास उशिराने सुटेल
👉Dep Time ⏰ 02:30 AM.
========================
महत्त्वाचे: 6 जून रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन किंवा अधिकृत रेल्वे अॅपवर गाडीची स्थिती तपासूनच प्रवास करावा.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत