Contact Banner

भोरगाव लेवा पंचायतीतर्फे ‘लेवा स्वररत्न २०२६’ स्पर्धेचे आयोजन; गायक-गायिकांना सुवर्णसंधी

bhorgaon-leva-panchayat-leva-swararatna-spardha-2026-bhusawal


भोरगाव लेवा पंचायतीतर्फे ‘लेवा स्वररत्न २०२६’ स्पर्धेचे आयोजन; गायक-गायिकांना सुवर्णसंधी

भुसावळ (प्रतिनिधी) : भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेतर्फे लेवा पाटील समाजातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि नवोदित गायक-गायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेवा स्वररत्न स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.


bhorgaon-leva-panchayat-leva-swararatna-spardha-2026-bhusawal


स्पर्धेसाठी इच्छुकांच्या निवड चाचण्या (ऑडिशन) १८ व १९ जून रोजी जामनेर रोडवरील भिरूड हॉस्पिटलसमोरील प्राची बंगला येथे सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत घेण्यात येणार आहेत. ऑडिशनमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १२ सोलो आणि १२ ड्युएट अशा एकूण २४ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल.

निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये २१ जून रोजी प्रभाकर हॉल येथे मुख्य स्पर्धा रंगणार असून सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत उपांत्य फेरी, तर रात्री ८ ते १० या वेळेत अंतिम फेरी होईल. त्यानंतर रात्री १० वाजता बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

स्पर्धेतील सोलो व ड्युएट या दोन्ही गटांतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ५१०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३१०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २१०० रुपये रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक गायक-गायिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष सुहास चौधरी व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी सुभाषचंद्र भंगाळे, आरती चौधरी आणि मंगला पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.