Contact Banner

राज्याचे सीईटी सहायता केंद्र केसीई कॉलेजात सुरू विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृत्तीसंदर्भातील सर्व सेवा मोफत

 

state-cet-student-help-center-started-at-kce-college-jalgaon


राज्याचे सीईटी सहायता केंद्र केसीई कॉलेजात सुरू

विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृत्तीसंदर्भातील सर्व सेवा मोफत

जळगाव | प्रतिनिधी

सीईटी परीक्षा, अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच विविध विद्याशाखांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसह शिष्यवृत्ती योजनांची माहिती आता जळगावमधील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनुसार राज्यभरात ४० सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्रे १० जूनपासून सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी जळगावचे मुख्य सहायता केंद्र केसीई अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात कार्यान्वित झाले असून राजीव जामोदकर यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


state-cet-student-help-center-started-at-kce-college-jalgaon


दरवर्षी सीईटीचा निकाल लागल्यानंतर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) फेऱ्या सुरू होतात. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी इंटरनेट कॅफे किंवा मध्यस्थांवर अवलंबून राहतात. अनेकदा चुकीच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेले हे ‘वन-स्टॉप’ विद्यार्थी सहायता केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी, शिष्यवृत्ती अर्ज भरणे, तांत्रिक अडचणींचे निराकरण तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि समुपदेशन अशा विविध सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक बचत होण्यास मदत होणार असून प्रवेश प्रक्रियेत होणारा गोंधळ आणि मध्यस्थांकडून होणारी आर्थिक फसवणूकही रोखली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.