Contact Banner

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग; १६ शहरांतील संघांचा सहभाग, ३१ सामन्यांचा थरार

 

bhusawal-neve-vani-samaj-box-cricket-spardha-2026-16-city-teams-31-matches

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग; १६ शहरांतील संघांचा सहभाग, ३१ सामन्यांचा थरार


bhusawal-neve-vani-samaj-box-cricket-spardha-2026-16-city-teams-31-matches


भुसावळ (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : येथील नेवे-वाणी समाज मंडळाच्या वतीने रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले असून यावल रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सकाळी ६ वाजल्यापासून या क्रीडा महोत्सवाला सुरुवात होणार आहे. समाजातील युवा खेळाडूंना आपल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच समाजबांधवांमध्ये एकोपा व स्नेह वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी ६ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून स्पर्धेत एकूण ३१ सामने खेळविण्यात येणार आहेत. दिवसभर क्रिकेटचा रोमांचक थरार अनुभवायला मिळणार असून रात्री ८ वाजता बक्षीस वितरण समारंभाने स्पर्धेचा समारोप होईल. या स्पर्धेला महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. भुसावळ, जळगाव, साकळी, यवतमाळ, पुणे, रिंगणगाव, चुंचाळे, यावल आणि मुंबई या शहरांतील संघांसह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर व गुजरातमधील सुरत येथील संघांनीही सहभाग नोंदविला आहे.

या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण समाज एकत्र येणार असल्याने भुसावळ व परिसरातील सर्व समाजबांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन नेवे-वाणी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष किशोर गजानन नेवे, उपाध्यक्ष दिपक हरिभाऊ नेवे, सचिव राम सुधाकर माहूरकर, महिला मंडळ अध्यक्षा विनीता सुनिल नेवे, उपाध्यक्षा अंजली प्रशांत नेवे, सचिव पूजा उदय नेवे यांच्यासह समस्त नेवे-वाणी समाज मंडळ परिश्रम घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.