Contact Banner

श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

rn-mehta-hindi-primary-vidyamandir-bhusawal-international-yoga-day-celebrated

श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

भुसावळ | प्रतिनिधी
श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी योगशिक्षक श्री. किशोरकुमार महापुरे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

कार्यक्रमात ताडासन, वृक्षासन, नौकासन, त्रिकोणासन, भुजंगासन, सुखासन, बालासन, सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम तसेच प्राणायाम आदी विविध योगप्रकारांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने योगासने सादर केली.

योगाभ्यासादरम्यान शिक्षकांनी प्रत्येक योगासनाचे महत्त्व आणि त्याचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. श्री. रवींद्र पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद केले.

यावेळी शाळेच्या प्रधानाध्यापिका सौ. रिता शर्मा यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करत, “व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी योगासने नियमित करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.