Contact Banner

वाढदिवसानिमित्त जन्मभूमी व कर्मभूमीत वृक्षारोपण; चंद्रशेखर फिरके यांचा आदर्श उपक्रम

ek-ped-maa-ke-naam-tree-plantation-by-chandrasekhar-firke-on-birthday


 एक पेड माँ के नाम उपक्रमातून तीन भावंडांचा अनोखा संदेश; वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

यावल (प्रतिनिधी) : भारताचे माननीय पंतप्रधान यांनी सुचविलेल्या "एक पेड माँ के नाम" या उपक्रमातून प्रेरणा घेत न्हावी (ता. यावल) येथील जिल्हा परिषद कर्मचारी श्री. चंद्रशेखर रमेश फिरके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जन्मभूमी आणि कर्मभूमीत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला. प्रथम त्यांच्या मूळ गावी न्हावी (ता. यावल) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक (सोमवारा) येथे कै. अवी दादा फिरके यांच्या अपूर्ण इच्छेनुसार त्यांच्या ग्रुपसमोर वृक्षारोपण करण्यात आले. जेष्ठ बंधू योगिराज (भरत) फिरके, बहीण पुनम कुरकुरे व स्वतः चंद्रशेखर फिरके यांनी प्रत्येकी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावले. छाया फिरके, शरद महाजन व देवेंद्र चोपडे यांच्या हस्ते तीन बकुळीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी नितीन सर, के. जी. पाटील, हर्षद महाजन, प्रवीण वारके, पराग वाघुळदे, उमेश बेंडाळे, जयंत बेंडाळे, सागर चौधरी, संदेश महाजन, धिरज चौधरी, धिरज पाटील, एच. डी. चौधरी, एल. डी. चौधरी, सागर फिरके, गणेश इंगळे, प्रशांत बोरोले, भरत मोरे, गणेश सूर्यवंशी, प्रकाश मोतीवाले, अमोल बाक्षे, संजय चोपडे, सुभाष मामा बागुल, निलेश कोलते, जीवन चौधरी, चेतन तळेले, करण बारेला पाटील, जयराम वारके, जयंत चौधरी, रोहिदास फालक व रितेश सिसोदिया उपस्थित होते.

याचवेळी शेजारी रितेश सिसोदिया यांचा मुलगा चि. रिशभ याचा वाढदिवसही साधेपणाने साजरा करण्यात आला.

त्यानंतर प्रा. आरोग्य केंद्र, निंभोरा बु. (ता. रावेर) येथे वाहन चालक संतोष लोंढे यांच्या सहकार्याने वड, बकुळ आणि पिंपळ या वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यालय प्रमुख डॉ. निरज पाटील, डॉ. हर्षल वाघ व ज्येष्ठ कर्मचारी व्यंकटी जबडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बजरंग वाठ, भागवत इंगळे, भारती रामावत, किरण बढे, विशाल भोई, रंजना तायडे, दिनकर बोरनारे, अमर महाजन, अश्विन गुंडाळे व सरिता महाजन उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. चंद्रशेखर फिरके म्हणाले, "केवळ केक कापून किंवा हार-तुरे स्वीकारून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा, आपल्याला जीवन प्रदान करणाऱ्या निसर्गाचे आणि जन्मदात्या आईचे ऋण फेडण्यासाठी वाढदिवस हेच योग्य औचित्य आहे. जन्मभूमी आणि कर्मभूमी या दोन्ही ठिकाणांनी मला भरभरून दिले आहे. त्यामुळे या दोन्ही मातीची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे."


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.