Contact Banner

मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्याविरोधात मॉर्फ फोटो व बदनामीकारक पोस्टप्रकरणी सावदा पोलिसांत तक्रार

 

complaint-filed-at-savda-police-over-defamatory-social-media-posts-against-minister-girish-mahajan

मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्याविरोधात मॉर्फ फोटो व बदनामीकारक पोस्टप्रकरणी सावदा पोलिसांत तक्रार

सावदा | प्रतिनिधी

राज्याचे मंत्री गिरीषभाऊ महाजन यांची सामाजिक, राजकीय व सार्वजनिक प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर मॉर्फ केलेले फोटो तसेच खोटा व बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडिया माध्यमांद्वारे काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती आणि मॉर्फ केलेले फोटो प्रसारित केले. या पोस्ट केवळ टीकेपुरत्या मर्यादित नसून, बदनामी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होत असून सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी सुषमा अंधारे, चेतन गांगुर्डे, दीक्षा पवार, उदय भिसे, कपिल मस्के पाटील, गजाभाऊ, नामदेव ढवळे पाटील यांच्यासह अन्य काही जणांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली असून त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर दुर्गेश प्रभाकर पाटील (अध्यक्ष), विनायक दुर्योधन कोळी (सरचिटणीस), महेश प्रभाकर अकोले, संजय काशिनाथ महाजन, रेखाताई रामदास बोंडे (जिल्हाध्यक्ष), जितेंद्र सुरेश चौधरी (कोषाध्यक्ष), रंजना जितेंद्र भारंबे (गटनेत्या), जितेंद्र किसन भारंबे, शुभम एकनाथ पाटील (युवा अध्यक्ष), यश महाजन, गोपाळ रामदास महाजन, सानिका श्रीकांत मटकरी, विद्यमान काशिनाथ शिंदे, दीपक रमेश श्रावगे, सारिका भारत चव्हाण, राहुल गोपाळ महाजन, सनी प्रमोद पायल, नितीन रामदास पाटील, राजेंद्र माणिकराव पाटील, पंकज राजाराम येवले, सागर दुर्गादास चौधरी, श्रीकांत वसंत महाजन (माजी युवा अध्यक्ष), संतोष घनश्याम परदेशी, सचिन चुडामण बाहाटे आणि मनोज कैलास धनगर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.