Contact Banner

काँग्रेसकडून विशेष मतदार नोंदणी पुनरावलोकनासाठी बीएलए-१ नियुक्त्या जाहीर

 

congress-appoints-bla-1-agents-for-sir-voter-list-revision-in-jalgaon-east

विशेष मतदार नोंदणी पुनरावलोकनासाठी काँग्रेसकडून बीएलए-१ नियुक्त्या जाहीर

congress-appoints-bla-1-agents-for-sir-voter-list-revision-in-jalgaon-east
जाहिरात




congress-appoints-bla-1-agents-for-sir-voter-list-revision-in-jalgaon-east
जाहिरात


लेवाजगत न्यूज रावेर : आगामी विशेष मतदार नोंदणी पुनरावलोकन (SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विविध विधानसभा मतदारसंघांसाठी बीएलए-१ (Booth Level Agent) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटी, जळगाव (पूर्व) यांच्या वतीने देण्यात आली.

यानुसार चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी ॲड. संदीपभैय्या पाटील, भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. राजेश मानवतकर, जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी शरद त्र्यंबक पाटील, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. जगदीश पाटील तसेच रावेर विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय शिरीष चौधरी यांची बीएलए-१ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्त पदाधिकारी विशेष मतदार नोंदणी पुनरावलोकन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, नव्या मतदारांची नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे काम करणार आहेत.

दरम्यान, जिल्हा काँग्रेस कमिटीने सर्व सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, युवक, महिला आणि जागरूक नागरिकांना या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे हा लोकशाहीचा मूलभूत आधार असून कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष मतदार नोंदणी पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नागरिकांना मदत, मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने पुढे यावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी, जळगाव (पूर्व) यांच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.