Contact Banner

भुसावळात एसीबीची धडक कारवाई; सहकार विभागाचे दोन लेखापरीक्षक ३० हजारांच्या लाचेसह जेरबंद

bhusawal-acb-trap-two-cooperative-auditors-caught-taking-rs-30000-bribe-officer-absconding

भुसावळात एसीबीची धडक कारवाई; सहकार विभागाचे दोन लेखापरीक्षक ३० हजारांच्या लाचेसह जेरबंद

bhusawal-acb-trap-two-cooperative-auditors-caught-taking-rs-30000-bribe-officer-absconding
जाहिरात

bhusawal-acb-trap-two-cooperative-auditors-caught-taking-rs-30000-bribe-officer-absconding
जाहिरात

भुसावळ | प्रतिनिधी

सावकारी परवाना मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ येथील सहकार विभागाशी संबंधित दोन प्रमाणित लेखापरीक्षकांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईत सहकार विभागाचा एक अधिकारी मात्र पसार झाल्याने त्याचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुरेश जनार्दन विसपुते (वय ६२, भुसावळ) आणि हेमंत प्रकाश काळे (वय ४०, जळगाव) यांचा समावेश आहे. तर या प्रकरणातील सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड हा कारवाईची चाहूल लागताच फरार झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

तक्रारदाराकडून सावकारी परवान्याच्या कामासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. पडताळणीनंतर तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी सापळा रचला.

सायंकाळी भुसावळमधील नाहाटा चौफुली परिसरात दोन्ही लेखापरीक्षक लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी आले असता एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. मात्र, कारवाईची माहिती मिळताच सहकार अधिकारी विजय गरूड तेथून पसार झाला.

ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून फरार अधिकाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.