Contact Banner

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

diesel-to-electric-vehicle-dr-ulhas-patil-institutions-eco-friendly-decision


डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेत दैनंदिन कामकाजासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू करण्यात आला असून, त्यामुळे डिझेलवरील खर्चात मोठी बचत होत आहे.

महाविद्यालय आणि रुग्णालय इमारतीदरम्यान अधिकारी व कर्मचारी यांच्या ये-जा तसेच विविध विभागांमध्ये आवश्यक कागदपत्रे व साहित्य पोहोचविण्यासाठी यापूर्वी डिझेल वाहनांचा वापर केला जात होता. मात्र वाढते इंधन दर, ऊर्जा बचतीची गरज आणि पर्यावरण संरक्षणाचा विचार करून प्रशासनाने इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय स्वीकारला.


diesel-to-electric-vehicle-dr-ulhas-patil-institutions-eco-friendly-decision


संस्थेच्या विस्तीर्ण परिसरात विविध विभागांमध्ये वारंवार होणाऱ्या हालचालींसाठी इलेक्ट्रिक वाहन अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि किफायतशीर ठरत आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रवासाबरोबरच आवश्यक साहित्य आणि कागदपत्रांच्या वाहतुकीसाठीही या वाहनाचा प्रभावी वापर केला जात आहे.

या उपक्रमामुळे डिझेलवरील खर्चात लक्षणीय बचत होत असून कार्बन उत्सर्जनातही घट होत आहे. ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर संस्थेकडून सातत्याने भर दिला जात आहे.

पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासमोर सकारात्मक आदर्श निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न असून, अशा उपक्रमांमुळे इतर शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांनाही प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.