Contact Banner

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

 

dr-varsha-patil-college-celebrates-world-environment-day-jalgaon

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

लेवाजगत न्यूज | जळगाव
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.


dr-varsha-patil-college-celebrates-world-environment-day-jalgaon


कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. शिवानी महाजन यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याची गरज अधोरेखित केली.

या निमित्ताने महाविद्यालयात स्वच्छता मोहीम तसेच पर्यावरण जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुक्त परिसर, जलसंवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे परिसर स्वच्छ करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला.

यंदाचा जागतिक पर्यावरण दिन हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यावर केंद्रित असून, पर्यावरण रक्षणासाठी ठोस कृती करण्याचे आवाहन जगभरातून करण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.