Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकीच्या प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव



गोदावरी अभियांत्रिकीच्या प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

लेवाजगत न्यूज | जळगाव-

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र प्रकाश मराठे यांनी संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण करून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.




डॉ. मराठे यांनी आपल्या संशोधनाद्वारे शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, तसेच गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. मराठे यांच्या या यशामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.