Contact Banner

रा. जि. प. शाळा कडापे येथे वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शैक्षणिक साहित्य वाटप

 

educational-material-distribution-in-memory-of-father-at-zp-school-kadape

रा. जि. प. शाळा कडापे येथे वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी – प्रशांत म्हात्रे (कडापे)

आई-वडील हे आपल्या जीवनाचे आधारस्तंभ असतात. त्यांच्या संस्कारांमुळेच आपले अस्तित्व घडते. त्यांच्या ऋणाची परतफेड करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. तसेच समाजाने दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवून समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करणे हेही महत्त्वाचे मानले जाते.


educational-material-distribution-in-memory-of-father-at-zp-school-kadape
जाहिरात

educational-material-distribution-in-memory-of-father-at-zp-school-kadape
जाहिरात


याच भावनेतून कडापे येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज कमलाकर म्हात्रे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रा. जि. प. शाळा कडापे व अंगणवाडी कडापे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

कै. कमलाकर बुधाजी म्हात्रे (काकाजी) हे मुंबईतील हिरामिस्टन हॉटेल, मशीद बंदर येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. गावातील दिलदार व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त दि. १६ जून २०२६ रोजी त्यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक सर्वेश्वर ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी पंकज म्हात्रे यांच्या पत्नी अंकिता म्हात्रे, बंधू सुरज प्रभाकर म्हात्रे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश थळी, पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्यानंतर शाळेच्या वतीने पंकज म्हात्रे यांचे विशेष आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला रा. जि. प. शाळा कडापेचे विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडिलांच्या स्मृती जपण्याचा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम सर्वांकडून कौतुकास्पद ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.