पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न
पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न
लेवाजगत न्यूज | जळगाव
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज दि. ५ जून रोजी जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.
यावेळी राज विद्यालय तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात माजी महापौर सौ. जयश्रीताई महाजन, नगरसेविका व मुख्याध्यापिका, पोलीस दक्षता समितीचे चंदन पाटील, साईमतचे वार्ताहर दीपक लोखंडे, पीएसआय संजय भांडारकर, संजय दोरकर, संजय सोनवणे, भरत चव्हाण, आरती कुमावत मॅडम, शशिकांत इंगळे, वेदांत एज्युकेशनच्या संचालिका हर्षली ढाके तसेच जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत