Contact Banner

परिसर मुलाखतीतून गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

 

godavari-college-engineering-polytechnic-two-students-selected-campus-placement

परिसर मुलाखतीतून गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाऊंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव येथील संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थिनी मृणाली सपकाळे हिची आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॉग्निझंटमध्ये, तर विद्यार्थी गणेशराज पाटील यांची अॅक्सेंचरमध्ये परिसर मुलाखतीतून निवड झाली आहे.

दोन्ही विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, तांत्रिक कौशल्ये आणि उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध तांत्रिक तसेच व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. याच तयारीच्या बळावर त्यांनी निवड प्रक्रियेत यश संपादन केले.


godavari-college-engineering-polytechnic-two-students-selected-campus-placement


गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच रोजगारक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, मॉक इंटरव्ह्यू आणि उद्योग क्षेत्राशी संलग्न उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. महाविद्यालयाचा प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून अनेक विद्यार्थी देशातील प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडूनही त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.