गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
लेवाजगत न्यूज | जळगाव : गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ या संकल्पनेवर आधारित योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या योगा हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमास गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, योगशिक्षक डॉ. अतुल बर्हाटे तसेच सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.
डॉ. अतुल बर्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकवृंदांनी विविध योगासने व प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, बद्धकोणासन, वज्रासन, मंडुकासन, त्रिकोणासन, शवासन यांसह कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी या प्राणायामांचा समावेश होता. तसेच नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्यविषयक फायदे यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील तसेच डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) यांनी कौतुक केले.
कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत