गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. पदवी
गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. पदवी
लेवाजगत न्यूज | जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. पंकज रमेश बोंडे यांनी "एसएस वापरून वायर कट इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग प्रक्रियेच्या मशिनिबिलिटी ऑप्टिमायझेशनची अंमलबजावणी" या विषयावर संशोधन कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. आधुनिक उत्पादन क्षेत्र आणि औद्योगिक प्रक्रियांशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या व तांत्रिक विषयावर त्यांनी हे संशोधन केले असून, त्याचा उत्पादन कार्यक्षमता वाढविण्यास तसेच विविध औद्योगिक प्रक्रियांमध्ये सुधारणा घडवून आणण्यास मोठा फायदा होणार आहे. आपल्या संशोधनाद्वारे शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत त्यांनी सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली आहे.
डॉ. बोंडे यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत