Contact Banner

एनपीटीईएल-स्वयंम अभ्यासक्रमात गोदावरी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

 

godavari-institute-management-research-students-success-nptel-swayam-jalgaon

एनपीटीईएल-स्वयंम अभ्यासक्रमात गोदावरी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

लेवाजगत न्यूज | जळगाव

godavari-institute-management-research-students-success-nptel-swayam-jalgaon


गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील एनपीटीईएल-स्वयंम ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि तांत्रिक कौशल्य विकासाच्या प्रयत्नांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

‘क्लाउड कॉम्प्युटिंग’ या एनपीटीईएल अभ्यासक्रमात एमसीए द्वितीय वर्षातील निकिता किरण तयाडे यांनी ७८ गुण तर चौधरी सर्वेश विलास यांनी ७५ गुण मिळवत ‘इलाईट प्लस सिल्वर मेडल’ प्राप्त केले. तसेच ‘जॉय ऑफ कॉम्प्युटिंग युझिंग पायथॉन’ या अभ्यासक्रमात स्वाती संजय बाविस्कर यांनी ९२ गुण मिळवत ‘इलाईट प्लस गोल्ड मेडल’ पटकावले.

याशिवाय विनोद सुखलाल महाजन (८४ गुण), भूमिका बालू नाळे (८० गुण), मनोज विश्वास पाटील (७७ गुण) आणि नयना संजय बारी (७६ गुण) यांनी ‘इलाईट प्लस सिल्वर मेडल’ मिळवत संस्थेचे नाव उज्ज्वल केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके, सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सातत्यपूर्ण परिश्रम, स्व-अभ्यासाची वृत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानावरील प्रभुत्व यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावरील अशा अभ्यासक्रमांमध्ये मिळालेल्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेत आणखी भर पडणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.