सावदा पोलीस ठाण्याचे API विशाल पाटील यांची बदली; गणेश फड होणार नवे प्रभारी- जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय बदल्या
सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी विशाल पाटील यांची बदली; गणेश फड होणार नवे प्रभारी
जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय बदल्या
लेवाजगत न्यूज जळगाव : जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत जनहित, प्रशासकीय कारणे तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विशाल पुंडलीक पाटील यांची बदली पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आ.गु.शा. जळगाव येथे कार्यरत असलेले सपोनि गणेश पांडुरंग फड यांची सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय पोनि कावेरी महादेव कमलाकर यांची नियंत्रण कक्ष जळगाव येथून जिल्हा विशेष शाखा जळगाव येथे, तर पोनि प्रदीप खंडू ठाकूर यांची नियंत्रण कक्षातून सायबर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
सपोनि राहुल भाऊसाहेब भंडारे यांची भुसावळ शहर पोलीस ठाण्यातून शहर वाहतूक शाखा भुसावळ येथे, तर सपोनि निलेश दिवाणसिंग राजपूत यांची रामानंदनगर पोलीस ठाण्यातून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
तसेच सपोनि प्रमोद तात्यासाहेब वाघ यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यातून आर्थिक शाखा जळगाव येथे, पोउनि संतोष काशिनाथ पवार यांची धरणगाव पोलीस ठाण्यातून स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे आणि पोउनि सुनील शामकांत पाटील यांची एटीबी जळगाव येथून डायल ११२ विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली आदेशाधीन सर्व अधिकाऱ्यांना नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत