जळगावातील ज्येष्ठ नागरिक दगडू मोतीराम वारके यांचे निधन
जळगावातील ज्येष्ठ नागरिक दगडू मोतीराम वारके यांचे निधन
जळगाव प्रतिनिधी : जळगाव येथील जुनी पोस्टल कॉलनी परिसरातील रहिवासी तथा ज्येष्ठ नागरिक दगडू मोतीराम वारके (वय ९२) यांचे गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी पहाटे १.०५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वारके कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ते प्लॉट क्रमांक ५, जुनी पोस्टल कॉलनी, राधाकृष्ण मंदिराजवळ, जळगाव येथे वास्तव्यास होते. स्वभावाने प्रेमळ व शांत असलेल्या वारके यांनी आपल्या कुटुंबाला संस्कारांची समृद्ध परंपरा दिली. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे तसेच आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पश्चात डॉ.सुनिल दगडू वारके,सावदा येथिल निवृत्त शिक्षक रविंद्र दगडू वारके, ठेकेदार राजेंद्र दगडू वारके व संजय दगडू वारके असा परिवार आहे.ते सावदा येथिल माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय प्रेमचंद महाजन यांचे मेहुणे होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत