Contact Banner

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त रोझोदा येथे वृक्षारोपण

 

tree-plantation-drive-held-at-rozoda-on-mla-amol-jawale-birthday


आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त रोझोदा येथे वृक्षारोपण

लेवाजगत वेबसाईट जाहिरात


लेवाजगत न्यूज रोझोदा: रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त रोझोदा परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोझोदा गावात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.


यावेळी माजी सभापती मिलिंद वायकोळे, सरपंच पुष्कर फेगडे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नितीन भंगाळे, लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ललित धांडे, उपाध्यक्ष रमेश महाजन, दूध डेअरीचे चेअरमन दीपक महाजन, माजी तालुका उपाध्यक्ष रोशन सरोदे, चेतन भारंबे, खिलचंद धांडे, दीपक धांडे, आशिष फेगडे, अतुल मेढे, रुपेश फेगडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी आणि रोझोदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार अमोल जावळे यांनी वाढदिवसानिमित्त होर्डिंग, बॅनर यावरील खर्च टाळून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत रोझोदा येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.