Contact Banner

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी : मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात

 

ladki-bahin-yojana-may-installment-credit-started-beneficiaries-bank-accounts

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी : मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात


लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी : मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी : मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात


लेवाजगत न्यूज मुंबई-राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मे महिन्याचा सन्मान निधी १५ जूनच्या संध्याकाळपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे वितरित केल्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता टप्प्याटप्याने लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे.

मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाने १० जून रोजी महिला व बालविकास विभागाकडे ३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास मंजुरी दिली होती.

१ कोटी ७७ लाख महिला पात्र

शासनाच्या माहितीनुसार, या योजनेसाठी राज्यभरातून सुमारे अडीच कोटी महिलांनी अर्ज केले होते. अर्जांची दीर्घकालीन पडताळणी आणि छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० एप्रिलपर्यंत अंतिम यादी तयार करण्यात आली. या प्रक्रियेत राज्यातील सुमारे १ कोटी ७७ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. तर निकषांची पूर्तता न झाल्याने आणि विविध त्रुटींमुळे जवळपास ७० लाख अर्ज अपात्र ठरविण्यात आले.

अपात्रतेची प्रमुख कारणे

  • शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न.
  • ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण राहणे.
  • अपूर्ण कागदपत्रे किंवा चुकीची माहिती.
  • दुबार अर्ज सादर करणे.
  • आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे.
  • मोबाईल क्रमांकातील बदलामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी.

खात्यात पैसे आले की नाही, कसे तपासाल?

अनेक महिलांना बँकेकडून रक्कम जमा झाल्याचा एसएमएस तात्काळ प्राप्त होत नाही. त्यामुळे मेसेज न आल्यास घाबरण्याची गरज नाही.

लाभार्थींनी:

  • बँकेचे अधिकृत मोबाईल अॅप वापरून खाते तपासावे.
  • बँक स्टेटमेंट पाहावे.
  • किंवा जवळच्या शाखेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्यावे.

यातून खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही याची खात्री करता येईल.

निवडणुकीत प्रभावी ठरलेली योजना

महायुती सरकारने २०२४ मध्ये सुरू केलेली ही योजना राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा सत्ता आल्यास लाभाची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या वाढीबाबत अद्याप अधिकृत अंमलबजावणी झालेली नाही. सध्या लाभार्थी महिलांना पूर्वीप्रमाणेच आर्थिक सहाय्य वितरित केले जात आहे.

लेवा जगत न्यूज
प्रतिनिधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.