Contact Banner

वडिलांचा विचारांचा वारसा जनसेवेची प्रेरणा देतो – आमदार अमोल जावळे

amol-jawale-pays-tribute-to-late-haribhau-jawale-on-6th-death-anniversary-at-bhalod

वडिलांचा विचारांचा वारसा जनसेवेची प्रेरणा देतो – आमदार अमोल जावळे

amol-jawale-pays-tribute-to-late-haribhau-jawale-on-6th-death-anniversary-at-bhalod
जाहिरात

amol-jawale-pays-tribute-to-late-haribhau-jawale-on-6th-death-anniversary-at-bhalod
जाहिरात

भालोद, ता. यावल | दि. १६ जून २०२६-

"वडिलांचे छत्र हरपण्याचे दुःख शब्दांत मांडता येत नाही. मात्र त्यांनी दिलेली मूल्ये, संस्कार आणि विचारांचा वारसा आपल्याला नेहमीच लढण्याची व जगण्याची ताकद देत असतो," असे भावनिक उद्गार आमदार अमोल जावळे यांनी काढले.

माजी खासदार तथा आमदार, कृषिमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणदिनानिमित्त भालोद येथे आयोजित स्मृतिसभेत ते बोलत होते. यावेळी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार अमोल जावळे म्हणाले की, "बाबा आज आपल्यात भौतिकरूपाने नसले तरी जनसेवा, प्रामाणिकपणा आणि कष्ट यांचा त्यांनी दिलेला वारसा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत जनतेची सेवा करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आजही माझ्या प्रत्येक कार्यात दिशा दाखवत असते."

स्मृतिसभेला विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि जावळे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.