Contact Banner

लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनतर्फे प्रथमच "लेवा चषक २०२६" बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

 

leva-chashak-2026-chess-and-carrom-tournament-concludes-with-enthusiasm-in-ambarnath

लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनतर्फे प्रथमच "लेवा चषक २०२६" बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

ठाणे लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :
लेवा समाजामध्ये क्रीडाभावना रुजविणे, सर्व वयोगटातील समाजबांधवांना एकत्र आणणे आणि समाजातील एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशन, अंबरनाथ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "लेवा चषक २०२६" बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा रविवारी (दि. १४ जून) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल्या.


leva-chashak-2026-chess-and-carrom-tournament-concludes-with-enthusiasm-in-ambarnath
जाहिरात


अंबरनाथमध्ये वास्तव्यास असलेल्या लेवा समाज बांधवांसाठी अशा प्रकारची ही पहिलीच स्पर्धा ठरली. या स्पर्धेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ७५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील स्पर्धकांनी आपल्या क्रीडा कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

स्पर्धेचे उद्घाटन वराडे बिल्डर्सचे संचालक विजय वराडे आणि तुकाराम नेहेते यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय वराडे यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देत समाजामध्ये अशा क्रीडा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास खान्देश सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नितीनदादा जावळे आणि राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त कामिनीताई जावळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.

लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनतर्फे स्पर्धेस आर्थिक व प्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजकांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते

५ ते १० वर्षे गट :
प्रथम – अक्षिता राणे
द्वितीय – अर्णव पाटील

११ ते १८ वर्षे गट :
प्रथम – आयुष पाटील
द्वितीय – अरुल नारखेडे

१९ ते ५० वर्षे गट :
प्रथम – तनमय चौधरी
द्वितीय – प्रथमेश वराडे

५० वर्षांवरील गट :
प्रथम – गिरीश चौधरी
द्वितीय – तुकाराम नेहेते

कॅरम स्पर्धेतील विजेते

सिंगल्स (५ ते १० वर्षे)
प्रथम – प्रथमेश नेहेते
द्वितीय – लवेश नारखेडे

डबल्स (५ ते १० वर्षे)
प्रथम – श्लोक नेमाडे व लवेश नारखेडे
द्वितीय – दर्श धांडे व स्वरा नेमाडे

सिंगल्स (११ ते १८ वर्षे)
प्रथम – गोजस चौधरी
द्वितीय – हितांशू चौधरी

डबल्स (११ ते १८ वर्षे)
प्रथम – हितांशू चौधरी व ऋतूज तळेले

पुरुष सिंगल्स (१९ ते ५० वर्षे)
प्रथम – भूषण चौधरी
द्वितीय – लोकेश चौधरी

महिला सिंगल्स (१९ ते ५० वर्षे)
प्रथम – हर्षला नेमाडे
द्वितीय – अमृता धांडे

डबल्स (१९ ते ५० वर्षे)
प्रथम – लोकेश चौधरी व किरण नेमाडे
द्वितीय – भूषण चौधरी व तन्मय चौधरी

मिश्र दुहेरी (१९ ते ५० वर्षे)
प्रथम – भूषण चौधरी व ज्योत्स्ना चौधरी
द्वितीय – लोकेश चौधरी व वैशाली पाटील

५० वर्षांवरील गट
प्रथम – उल्हास तळेले
द्वितीय – संगीता ढाके

स्पर्धेच्या यशामागे किरण नेमाडे, भूषण चौधरी, रुपेश धांडे, लोकेश चौधरी, विशाल खाचणे, कृष्णा महाजन, दीपक फालक, प्रतीक वराडे, पंकज नारखेडे, तुषार पाटील, नीरज चौधरी, राहुल पाटील, कौस्तुभ धांडे, प्रशांत पाटील, वैशाली पाटील, वैभव जावळे, हितेश पाटील, प्रथमेश वराडे, दुश्यंत नारखेडे आणि ध्रुव धांडे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा मोलाचा वाटा राहिला.

"हार-जीत हा खेळाचा एक भाग असला, तरी समाजाला एकत्र आणणे, क्रीडाभावना वृद्धिंगत करणे आणि एकोप्याचे नाते अधिक दृढ करणे हेच 'लेवा चषक २०२६' चे खरे यश ठरले," अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.