शोकवार्ता मिराबाई गोपाळ चौधरी यांचे निधन
शोकवार्ता
मिराबाई गोपाळ चौधरी यांचे निधन
लेवाजगत न्यूज निंभोरा बुद्रुक, ता. रावेर : येथील बस स्टँड परिसरातील रहिवासी मिराबाई गोपाळ चौधरी यांचे आजसोमवार दुपारी १२ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या मनोहर गोपाळ चौधरी, वासुदेव गोपाळ चौधरी तसेच चंद्रकांत गोपाळ चौधरी यांच्या मातोश्री होत.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५ वाजता निंभोरा बुद्रुक येथील बस स्टँड परिसरातील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून, त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो व चौधरी परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रभू चरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏
"आपल्या प्रेमळ स्वभावाने व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वाने सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या कै. मिराबाई गोपाळ चौधरी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन."



कोणत्याही टिप्पण्या नाहीत