संज्योत हॉस्पिटलचे नवीन वास्तूत स्थलांतर; ७ व्या वर्धापनदिनानिमित्त २३ जून रोजी विशेष कार्यक्रम
संज्योत हॉस्पिटल, सावदा येथे नवीन वास्तूत स्थलांतर; ७ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रम
सावदा (ता. रावेर) : आरोग्यसेवेतील विश्वास, गुणवत्ता आणि समर्पणाची परंपरा जपत कार्यरत असलेल्या संज्योत हॉस्पिटल आणि प्रसूतिगृह, सावदा यांनी आपल्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त मेडिसिन विभागासह स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे नवीन व प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतर केले असून, आधुनिक सुविधांसह रुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे.
या निमित्ताने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान नवीन वास्तूच्या उद्घाटनाचा व वर्धापनदिनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी व हितचिंतकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन वास्तूमध्ये सुरक्षित व सुसज्ज प्रसूती कक्ष, सर्व प्रकारच्या स्त्रीरोगांचे निदान व उपचार, गर्भधारणेदरम्यान संपूर्ण काळजी व मार्गदर्शन, अत्याधुनिक प्रयोगशाळा व वैद्यकीय सुविधा तसेच प्रशस्त व आधुनिक OPD आणि IPD विभाग उपलब्ध करण्यात आले आहेत.
या हॉस्पिटलमध्ये डॉ. आशिष संजय सरोदे (एमबीबीएस, एमडी - मेडिसिन) हे मधुमेह, रक्तदाब व हृदयविकार तज्ज्ञ म्हणून सेवा देत असून, डॉ. मोहिनी आशिष सरोदे (एमबीबीएस, एमएस - स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ) या स्त्रीरोग व प्रसूती विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत.
संज्योत हॉस्पिटल हे बसस्थानकाच्या मागे, सावदा (ता. रावेर, जि. जळगाव) येथे असून, नव्या अत्याधुनिक सुविधांसह रुग्णसेवा अधिक प्रभावीपणे देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत