आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी उत्साहात वृक्षारोपण महालक्ष्मी बायोजेनिक्सच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी उत्साहात वृक्षारोपण
महालक्ष्मी बायोजेनिक्सच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
रावेर/यावल प्रतिनिधी : आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर व यावल तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत "एक वृक्ष लावा, हरित भविष्यासाठी हातभार लावा" हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला.
महालक्ष्मी बायोजेनिक्सच्या सौजन्याने वनोली–रिधुरी–कोसगाव शिवार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महालक्ष्मी बायोजेनिक्सचे संचालक डॉ. प्रशांत सरोदे, भूपेंद्र सरोदे, सावदा येथील डॉ. शेखर पाटील, अॅड. कालिदास ठाकूर, चंद्रसिंग जाधव, राकेश कासार, योगेश राजाराम भंगाळे, प्रगतशील शेतकरी प्रकाश भागवत भंगाळे, धीरज किसन महाजन, जीवन चौधरी (वनोली), प्रकाश बखाल, मुकेश सोनवणे, संदीप अरुण सोनवणे, शालिक सोनवणे, वासुदेव सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुमारी दिशा भूपेंद्र सरोदे यांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व कुटुंबातील चांगल्या संस्कारांचा संदेश दिला. अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी आपल्या पत्नी व लहान मुलांसह उपस्थित राहून सामाजिक कार्यात कुटुंबाच्या सहभागाचा आदर्श निर्माण केला.
दरम्यान, महालक्ष्मी बायोजेनिक्सच्या पुढाकारातून चिनावल–कुंभारखेडा–सुखी नदी परिसरातही भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लावण्यात आलेली सर्व झाडे शंभर टक्के जगावीत यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महालक्ष्मी बायोजेनिक्सची खते, प्रत्येक झाडासाठी ट्री-गार्ड तसेच पाण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमात दिव्येश सरोदे, मानस सरोदे, मनोज हनोते, होमेश नेमाडे, प्रणव भंगाळे, भावेश महाजन, धवल महाजन, साई भंगाळे, मोक्षद नेमाडे आणि वैभव कोल्हे यांनी टीम म्हणून कार्य करत उपक्रम यशस्वी केला. तसेच फालक परिवार, चिनावल यांनी जागेची निवड व पाण्याची व्यवस्था करून सहकार्य केले.
स्थानिक कार्यकर्ते, शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाढदिवस समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श घालून दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांचे सातत्य राखण्याचा निर्धार व्यक्त केला आणि आमदार अमोलभाऊ जावळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत