Contact Banner

संस्कार, समर्पण आणि जनसेवेचा संकल्प; आ. नंदूभाऊ महाजन यांचा विधान भवनात प्रवेश

 

nandu-bhau-mahajan-bows-at-vidhan-bhavan-takes-oath-of-public-service

संस्कार, समर्पण आणि जनसेवेचा संकल्प; आ. नंदूभाऊ महाजन यांचा विधान भवनात प्रवेश






लेवाजगत न्यूज मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर आ. नंदूभाऊ महाजन यांनी आज मुंबई येथील विधान भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत लोकशाहीच्या या सर्वोच्च मंदिराप्रती आपला आदर व्यक्त केला. त्यांच्या या कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले असून विनम्रता, संस्कार आणि जनसेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा अधोरेखित झाली.

जनसेवा हाच धर्म मानून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अखंड कार्य करण्याचा संकल्प मनाशी बाळगत त्यांनी विधान भवनात प्रवेश केला. जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून विकास, प्रगती आणि लोकहितासाठी कार्य करण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


या प्रसंगी राज्याचे मंत्री , जिल्हा प्रमुख चंद्रकांत बावस्कर, अमित देशमुख, सावदा मंडळाध्यक्ष दुर्गेश पाटील तसेच महाजन परिवारातील सदस्य उपस्थित होते.

आ. नंदूभाऊ महाजन यांच्या या प्रतीकात्मक कृतीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून आगामी काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत विकासाभिमुख कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.