सावदा केंद्रावरील दहावी जून २०२६ परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर
सावदा येथील दहावी जून २०२६ परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर
सावदा, ता. रावेर (प्रतिनिधी) : श्री. आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा येथे आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी.) जून २०२६ परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्र क्रमांक ३७७० येथे दि. १६ जून २०२६ पासून परीक्षा सुरू होत असून या केंद्रावर एकूण २२० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था श्री. आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीतील दालन क्रमांक ०१ ते ०८ मध्ये करण्यात आली आहे.
या दालनांमध्ये बैठक क्रमांक D005291 ते D005510 या विद्यार्थ्यांना बसविण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घेऊन परीक्षेपूर्वी आपला बैठक क्रमांक व दालन क्रमांक तपासून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती परीक्षा केंद्राचे केंद्रसंचालक तथा ज्ञानगंगा विद्यालय, रायपूर (ता. रावेर) येथील मुख्याध्यापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत