Contact Banner

भुसावळातील श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

 

shri-r-n-mehta-hindi-primary-vidyamandir-bhusawal-school-praveshotsav-celebrated-with-enthusiasm

shri-r-n-mehta-hindi-primary-vidyamandir-bhusawal-school-praveshotsav-celebrated-with-enthusiasm

भुसावळातील श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

लेवाजगत न्यूज भुसावळ : येथील श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. रिता शर्मा, पालक प्रतिनिधी शबाना खानप्रशांत वानखेडे, तसेच शिक्षक प्रतिनिधी रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रवेशोत्सवानिमित्त नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालकांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले तसेच प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाला संस्मरणीय बनविण्यासाठी ‘पहिले पाऊल’ ही संकल्पनाही राबविण्यात आली.

शाळा प्रवेशोत्सवानिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्याध्यापिका सौ. रिता शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालू शैक्षणिक वर्षात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मोहिनी कोल्हे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. शितल इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण असून विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबद्दल आनंद आणि उत्सुकता पाहायला मिळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.