फैजपूर व सावदा येथे श्री स्वामी समर्थ पालखी पादुका दर्शन सोहळा सोमवारी
फैजपूर व सावदा येथे श्री स्वामी समर्थ पालखी पादुका दर्शन सोहळा सोमवारी
सावदा तालुका प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा दर्शन सोहळ्याचे आयोजन फैजपूर व सावदा येथे करण्यात आले आहे. अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे आगमन होणार असून भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सोमवार, दि. ०८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत फैजपूर येथील देवीवाडा परिसरातील जितेंद्र ओमप्रकाश वर्मा यांच्या निवासस्थानी पालखी पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार (प्रसाद) व्यवस्थाही करण्यात आली आहे.
त्यानंतर सकाळी ११ वाजता सावदा केंद्रात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र, अक्कलकोट यांच्या पालखी व पादुकांचे आगमन होणार आहे. पालखी आगमनानंतर दर्शन व आशीर्वादाचा कार्यक्रम होणार असून परिसरातील स्वामी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आयोजकांनी सर्व सेवेकरी, स्वामी भक्त व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेऊन कृपा आशीर्वाद प्राप्त करण्याचे आवाहन केले आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
संपर्क :
- जितेंद्र वर्मा – ७९६६६४५३२७०
- कोलते अप्पा (रावेर)
- बाळू पाटील सर (चिनावल)
- डॉ. मिलिंद वायकोळे (रोझोदा)
या धार्मिक सोहळ्यामुळे फैजपूर, सावदा व परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत